Special Report | मविआ सरकार तयार नाही, मग एसटी कर्मचाऱ्यांचा संप कसा संपणार?

Special Report | मविआ सरकार तयार नाही, मग एसटी कर्मचाऱ्यांचा संप कसा संपणार?

| Updated on: Nov 11, 2021 | 9:37 PM

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील बससेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. चाकरमानी कोंडीत सापडले असून, खासगी प्रवासी वाहतूकदारांनी पुण्यासाठी 1000, औरंगाबादसाठी 1200, मुंबईसाठी 600, नंदुरबारसाठी जवळपास 1600 रुपयांचे भाडे आकारणे सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगारवाढ करावा, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत घेण्यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेक संघटनांसह राजकीय पाठिंबाही मिळत आहे. पण काही जागी संप चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान एसटी कामगारांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज एसटी कामगारांच्या पाठी उभे राहणाऱ्यांनी त्यांचं सरकार असताना एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण का केलं नाही? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे. तसेच एसटी कामगारांना पुन्हा एकदा संप मागे घेण्याचं आवाहनही परब यांनी केलं आहे. आता पुढे काय होणार हे नेमकं सांगता येत नाहीये. या सर्वाबाबतच हा एक स्पेशल रिपोर्ट…