Nitesh Rane | एसटीची अवस्था वाईट, अनिल परब यांनी तासभर एसटीच्या सीटवर बसावं : नितेश राणे

Nitesh Rane | एसटीची अवस्था वाईट, अनिल परब यांनी तासभर एसटीच्या सीटवर बसावं : नितेश राणे

| Updated on: Nov 22, 2021 | 7:07 PM

आमदार नितेश राणे यांनी ठाणे डेपोमध्ये जाऊन एसटीची पाहणी केली. एसटी कामगार तासंतास अशा स्थितीत गाडी चालवतो. या लोकांनी एसटीची काय अवस्था केलीय, असा सवाल नितेश राणे यांनी केला. माझं आव्हान अनिल परब यांना आव्हान आहे की त्यांनी या सीटवर एक तास बसावं, मग कळेल की एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा काय असतात, असं नितेश राणे म्हणाले.

भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाणे डेपोमध्ये जाऊन एसटीची पाहणी केली. एसटी कामगार तासंतास अशा स्थितीत गाडी चालवतो. या लोकांनी एसटीची काय अवस्था केलीय, असा सवाल नितेश राणे यांनी केला. माझं आव्हान अनिल परब यांना आव्हान आहे की त्यांनी या सीटवर एक तास बसावं, मग कळेल की एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा काय असतात, असं नितेश राणे म्हणाले. (MLA Nitesh Rane criticizes Anil Parab and Ajit Pawar over ST workers’ strike)

नितेश राणेंची अनिल परब, अजित पवारांना आव्हान

मी अनिल परब यांनी या सीटवर एक तास तरी बसून दाखवावं. विलीनीकरण केलं नाही तर आम्ही त्यांना या सीटवर बांधून ठेऊ, असं नितेश राणे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचा तेरावा या सीटवर घालणार आहोत, असं नितेश राणे म्हणाले.

इतकंच नाही तर अजित पवार यांना विनंती आहे की त्यांनी चार पावलं पुढं येऊन या सीटवर बसून गाडी चालवून दाखवावी. गाडी चालवून दाखवावी आणि मग एसटी कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवावे की नाही, हे त्यांना कळेल, नितेश राणे म्हणाले.