एसटी कर्मचारी संपावर ठाम; सोलापूर विभागातील 650 कर्मचारी आंदोलनात सहभागी

एसटी कर्मचारी संपावर ठाम; सोलापूर विभागातील 650 कर्मचारी आंदोलनात सहभागी

| Updated on: Nov 22, 2021 | 11:45 AM

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपामुळे एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

सोलापूर – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपामुळे एसटीसेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. सोलापूर विभागातील जवळपास 650 पेक्षा अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बसस्थानक परिसरात शुकशुकाट असल्या पहायाला मिळत आहे. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसत असून, राज्यातील बस सेवा बंद असल्याने जवळपास दिवसाकाळी 12 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. याचा आढावा घेतला आहे, टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी रोहित पाटील यांनी