एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी पडळकर आणि खोत बैठकीसाठी सह्याद्रीवर दाखल

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी पडळकर आणि खोत बैठकीसाठी सह्याद्रीवर दाखल

| Updated on: Nov 23, 2021 | 6:38 PM

मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी 14 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नसल्याचं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. अशावेळी कुठला मध्यममार्ग या बैठकीतून निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी 14 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नसल्याचं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. अशावेळी कुठला मध्यममार्ग या बैठकीतून निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यात तब्बल साडे चार तास खलबतं झाली. त्यात पवारांनी एसटी महामंडळाची स्थिती समजून घेतली. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काही महत्वाच्या सूचनाही पवारांनी दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पवारांच्या सूचना पडळकर, खोत यांच्यासह एसची कर्मचाऱ्यांना मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.