Sadabhau Khot | एसटी कामगार सत्तेसाठी नाही तर न्यायासाठी पावसात भिजत आहेत – सदाभाऊ खोत
मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी आठवडाभरापासून ठाण मांडून आहेत. आज अचानक झालेल्या पावसातही एसटी कर्मचारी आझाद मैदानावरुन हलले नाहीत. यावरुन आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक टोला लगावत जोरदार टीका केलीय. कुणीतरी पावसात भिजला आणि सत्ता आणली. आता एसटी कामगार पावसात भिजतोय, त्यांचं विलिनीकरण करा, अशी मागणी खोत यांनी केलीय.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी आठवडाभरापासून ठाण मांडून आहेत. आज अचानक झालेल्या पावसातही एसटी कर्मचारी आझाद मैदानावरुन हलले नाहीत. यावरुन आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक टोला लगावत जोरदार टीका केलीय. कुणीतरी पावसात भिजला आणि सत्ता आणली. आता एसटी कामगार पावसात भिजतोय, त्यांचं विलिनीकरण करा, अशी मागणी खोत यांनी केलीय.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत रिमझिम पावसात ST कामगारांसोबत पावसामध्ये आंदोलनाला बसले. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, आम्ही आंदोलन करणार. सरकारला दिसत नाही का की पाऊस पडतोय. एसटी कामगार पावसात आहे. बीएमसी हेडकॉटर समोर आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांकडे कुणाचे लक्ष नाही, पाणी नाही, लाईट नाही, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आझाद मैदानातच मुक्काम राहिल, असं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय.