Dhananjay Mahadik | आंदोलनाची दखल न घेणाऱ्या परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी राजीनामा द्यावा

Dhananjay Mahadik | आंदोलनाची दखल न घेणाऱ्या परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी राजीनामा द्यावा

| Updated on: Nov 11, 2021 | 7:00 PM

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु केलंय. मात्र, या आंदोलनाची साधी दखलही परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी धनंजय महाडिक यांनी केलीय. महाडिक यांनी आज कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सुरु असलेल्या आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशावेळी माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु केलंय. मात्र, या आंदोलनाची साधी दखलही परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी धनंजय महाडिक यांनी केलीय. महाडिक यांनी आज कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सुरु असलेल्या आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप महाडिक यांनी केलाय. आंदोलकांसोबत चर्चा करुन मार्ग काढण्यापेक्षा हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं आश्वासन महाडिक यांनी यावेळी दिलंय.