Kunal Kamra Video : कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, स्टँडअप कॉमेडीचे सर्व शो बंद; प्रकरण काय?
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गाण्यावरून वाद पेटला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि शिवसैनिक आक्रमक झाला.
मुंबईतील खार येथील द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये होणारे स्टँडअप कॉमेडीचे सर्व शो बंद करण्यात आले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गाण्यावरून चांगलाच वाद पेटला असून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कामराच्या प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडी शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर हॉटेल प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. एका शोमध्ये कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल भाष्य करत विडंबनात्मक गाणं तयार केलं होतं. एकनाथ शिंदे हे बंड करत शिवसेनेमधून बाहेर पडले, राष्ट्रवादीचे दोन गट झाले, त्यासंदर्भात हे गाणं असल्याची माहिती आहे. दरम्यान या सगळ्या वादानंदर प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसल्याचं दिसताच कॉमेडियन कुणाल कामरा फरार झाल्याचे सांगितले जातेय. कुणाल कामरा काल रात्री मुंबईतून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...

'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप

वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
