Kunal kamra : कुणाल कामराचं ‘बुक माय शो’ला पत्र, ‘माझे शो काढायचे असतील तर…’
बुक माय शोने कुणाल कामरा याचे पूर्वीचे शो बुक माय शोवरून काढून टाकले होते. त्यानंतर कुणाल कामरा याने बुक माय शो ला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने त्याचे शो काढू नये अशी विनंती केली आहे.
स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केल्यानंतर कुणाल कामरावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. त्यानंतर कुणाल कामरावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली असताना कुणाल कामराचे शो बुक माय शो अॅप्लिकेशनवरून हटवण्यात आले होते. मात्र यासंदर्भात कुणाल कामरा याने बुक माय शोला एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. कुणाल कामराने बुक माय शोला लिहिलेल्या पत्रात त्याने त्याचे शो बुक माय शोवरून काढून टाकू नका, अशी विनंती केली आहे. इतकंच नाहीतर माझे शो काढायचे असतील तर माझ्या प्रेक्षकांचे नंबर मला द्या, असेही या पत्राद्वारे कुणाल कामराने म्हटलंय. यासह माझे शो बुक माय शोवरून काढून टाकल्यामुळे तुम्ही मला माझ्या प्रेक्षकांपासून दूर केलं असल्याचेही कामराने पत्राद्वारे सांगितलंय.

लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ...

राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला

एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव
