‘OBC , व्हीजेएनटीसाठी घोषणा केलेले 72 वसतीगृह सुरु करा’ OBC संघटनांची मागणी
वसतिगृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आलं. 36 मुलींसाठी व 36 मुलांसाठी असे 72 वसतिगृह सुरु करण्याची मागणी ओबीसी विद्यार्थ्यांनी केली आहे.
ओबीसी व्हीजेएनटीसाठी घोषणा केलेले 72 वसतिगृह सुरु करण्याची मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. वसतिगृह सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी भर पावसात आंदोलन केलं. वसतिगृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आलं. 36 मुलींसाठी व 36 मुलांसाठी असे 72 वसतिगृह सुरु करण्याची मागणी ओबीसी विद्यार्थ्यांनी केली आहे. जागेअभावी वसतिगृहे बांधायला अडचण येत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात खाजगी इमारतीत वसतिगृहे सुरू करण्यासंबंधी कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र वरील बाबींवर ठोस असे एकही पाऊल उचलले गेले नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
Latest Videos