मुंबई महापालिकेत 9 नगरसेवक वाढवणे हा निर्यण राजकीय फायद्यासाठी – Bhalchandra Shirsath
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या 227 वरून 236 होणार आहे. राज्य सरकारने सदस्य संख्या वाढवण्याच्या घेतलेल्या या निर्णयावर भाजपने मात्र विरोध दर्शवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यात पालिकेतील सदस्य संख्या नऊने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता पालिकेच्या निर्वाचित नगरसेवकांची संख्या 236 होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहीली.