धक्कादायक ! महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यात साडेतीन हजार मुली बेपत्ता, राज्य महिला आयोग सतर्क

धक्कादायक ! महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यात साडेतीन हजार मुली बेपत्ता, राज्य महिला आयोग सतर्क

| Updated on: May 16, 2023 | 9:41 AM

VIDEO | राज्य महिला आयोग सतर्क, रुपाली चाकणकर यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड, भयंकर वास्तवानंतर काय म्हणाल्या?

मुंबई : महाराष्ट्रातून मुली आणि महिला बेपत्ता होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या तीन महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या ही चिंताजनक आहे. मुली आणि महिलांची बेपत्ता होणारी आकडेवारी पाहता राज्य महिला आयोग सतर्क झालं आहे. महिला आयोगाकडून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहेत. महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात जवळपास 3500 पेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या मुली बेपत्ता होण्याचं नेमकं कारण काय? महिला आयोगाची याबाबतची मागणी काय? राज्य सरकारची भूमिका काय? या सर्व मुद्द्यांवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी टीव्ही 9 मराठीला महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुली बेपत्ता होण्यात वाढ झालीय. मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढतेय. याबाबत महिला आयोगासमोर अहवाल, उपाययोजना सादर करा अशा सूचना दिल्या होत्या. आयोग कार्यालयात याबाबत आज सुनावणी पार पडली. याबाबत अहवाल जरी सादर केला असला तरी यंत्रणा सक्षम नसल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. तर बेपत्ता महिलांना शोधण्यात यश मिळेल, अशी मला खात्री आहे. हरवलेल्या व्यक्तींची संख्या पाहता, राज्यातून दुबई आणि ओमानमध्ये महिलांची तस्करी होतेय, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला.

Published on: May 16, 2023 09:41 AM