वसईतील घटना हिंसक; राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या, आरोपीवर कारवाई होईपर्यंत…
राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी तरूणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर कठोर कारवाई होईपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असल्याचेही रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. बघा काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?
वसईत घडलेली घटना अतिशय हिंसक आहे असे म्हणत वसईतील ‘त्या’ घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी तरूणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर कठोर कारवाई होईपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असल्याचेही रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. ‘वसईमध्ये आज भर रस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. सखोल तपास करून आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करेल. ‘ अशी प्रतिक्रिया रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.