कधी कधी मला डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
'आमच्या राहुल गांधींना शक्तीचा अर्थ देखील माहिती नाही. आम्ही मातृशक्तीची वंदना करतोय. आणि ते म्हणताय, हे त्या शक्तीचा वापर करतील आणि आम्हाला काहीना काही करतील... हो आम्ही शक्तीचाच उपयोग करणार आहोत. पण मातृशक्तीचा उपयोग करून...'
राहुल गांधी यांना शक्तीचा अर्थ देखील माहिती नाही, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. कधी कधी मला डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो, आमच्या राहुल गांधींना शक्तीचा अर्थ देखील माहिती नाही. आम्ही मातृशक्तीची वंदना करतोय. आणि ते म्हणताय, हे त्या शक्तीचा वापर करतील आणि आम्हाला काहीना काही करतील… हो आम्ही शक्तीचाच उपयोग करणार आहोत. पण मातृशक्तीचा उपयोग करून… राहुल गांधी आम्ही ४०० पार करणार पण तुम्ही ४० पारही जाणार नाही, असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह राहुल गांधींना लगावला. यासह भंडारा गोदिंयामध्ये प्रफुल्ल पटेल इतके मजबूत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भंडारा गोदिंयात महायुतीचं कमळचं फुलणार असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विजयाच्या खात्रीबद्दल विश्वास व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील मेंढे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवार सुनील मेंढे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल, शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह महायुतीचे आमदार, कार्यकर्ता आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.