निवडणुकांचे बिगुल वाजले, ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी निवडणुका जाहीर; या दिवशी मतदान

निवडणुकांचे बिगुल वाजले, ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी निवडणुका जाहीर; या दिवशी मतदान

| Updated on: Apr 06, 2023 | 9:36 PM

VIDEO | राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचारसंहिता आणि आयोगाने कार्यक्रमही केला जाहीर

मुंबई : राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

Published on: Apr 06, 2023 09:36 PM