Dilip Walse Patil | अमरावतीत घडलेल्या घटनामध्ये जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई होणार

Dilip Walse Patil | अमरावतीत घडलेल्या घटनामध्ये जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई होणार

| Updated on: Nov 13, 2021 | 12:56 PM

दगडफेक करून मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 

मुंबई : त्रिपुरात जी घटना घडली त्यानुसार काही संघटनांनी निवेदनासाठी परवानगी मागितली होती. निवेदन द्यायला जात असताना काही लोकांनी दगडफेक करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज भाजपने बंद पुकारला होता. या बंद दरम्यान शांततेनेच मोर्चा होईल अशी अपेक्षा होती. पण त्यात काही अप्रिय घटना घडल्या. दगडफेक करून मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Published on: Nov 13, 2021 12:55 PM