Subhash Desai | राज्याचे वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने आणि गुजरातने थांबवावे : सुभाष देसाई

| Updated on: Dec 20, 2021 | 9:00 PM

केंद्र आणि अमित शहा आणि त्यांच्या गुजरात राज्याकडून महाराष्ट्राचे वैभव पळून नेण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. ते आधी थांबवा. महाराष्ट्राला वैभवशाली मानत असाल तर महाराष्ट्राचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे देसाई म्हणाले.

मुंबई : राज्याला गतवैभव मिळवून देण्यात महाविकास सरकार हतबल असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. त्याला आज राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘महाराष्ट्राच्या वैभवाची अमित शहा यांना चिंता वाटते ही गोष्ट दखल घेण्यासारखी आहे. तशी चिंता वाटत असेल आणि त्यासाठी सकारात्मक प्रयत्न, मदत राज्याला होणार असेल तिचे आम्ही स्वागत करतो. परंतु अनुभव वेगळे आहेत. केंद्र आणि अमित शहा आणि त्यांच्या गुजरात राज्याकडून महाराष्ट्राचे वैभव पळून नेण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. ते आधी थांबवा. महाराष्ट्राला वैभवशाली मानत असाल तर महाराष्ट्राचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे देसाई म्हणाले. तसेच बरोबरीचा मुकाबला नक्की होईल, मात्र 3 वर्षे वाट पाहा असेही ते म्हणाले आहेत.