VIDEO | ”अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सरकारच्या मनात द्वेष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रोखलंही नाही?”
मात्र, कार्यक्रमासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे हा कार्यक्रम वादात सापडला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये साजरी करण्यात आली. मात्र, कार्यक्रमासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे हा कार्यक्रम वादात सापडला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तर याचमुद्द्यावरून सदनातील ते पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावरून शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटोही दिसू नये, एवढा द्वेष राज्य सरकारच्या मनात आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. तर फुले आणि होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती, हे अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.