Balasaheb Thorat | कॉंग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळं देणं : बाळासाहेब थोरात

| Updated on: Dec 04, 2021 | 7:29 PM

वाईट दिवस येतील आणि जातीलही. पण तत्वज्ञान डावलले जाऊ शकत नाही. काँग्रेसला डावलणं म्हणजे विचारांना डावलणं आहे. काँग्रेसच्या विचारांना डावलणं म्हणजे फॅसिस्टवृत्तीला ताकद देणं आहे, असं सांगत थोरात यांनी सामनाच्या अग्रलेखाचं समर्थन केलं आहे.

नगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. काँग्रेसला डावलून कुणालाही पुढे जाता येणार नाही. काँग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ देणं आहे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधताना ममता बॅनर्जींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवतानाच आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखाची भलामण केली आहे. काँग्रेस हा जनमाणसातला राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेस हा केवळ पक्ष नाही तर विचार आहे. काँग्रेसचे विचार हे राज्यघटनेशी निगडीत आहेत. त्यामुळेच काँग्रेस शाश्वत पद्धतीने राहणार. वाईट दिवस येतील आणि जातीलही. पण तत्वज्ञान डावलले जाऊ शकत नाही. काँग्रेसला डावलणं म्हणजे विचारांना डावलणं आहे. काँग्रेसच्या विचारांना डावलणं म्हणजे फॅसिस्टवृत्तीला ताकद देणं आहे, असं सांगत थोरात यांनी सामनाच्या अग्रलेखाचं समर्थन केलं आहे.