आम्ही नवरदेववाले आहोत ते नवरीवाले, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
जळगावात माध्यमांशी बोलताना गेल्या काळातील केलेल्या चुकांची पुढच्या काळात भाजपकडून पुनरावृत्ती होऊ नये. अशी अपेक्षा आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. मागच्या काळात आम्ही मोदीजींचं काम केलं होतं. आम्ही नवरदेव वाले आहोत ते नवरीवाले आहे. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हाला नवरदेव वाला समजून मदत करावी हीच अपेक्षा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
मागच्या लोकसभेत भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केल होतं त्यानंतर विधानसभेत आमच्यासमोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले होते. आम्ही नवरदेववाले आहोत. ते नवरीवाले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हाला नवरदेववाला समजून मदत करावी, हीच अपेक्षा आहे, असे वक्तव्य करत जळगाव जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे गटाच्या नाराजीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जळगावात माध्यमांशी बोलताना गेल्या काळातील केलेल्या चुकांची पुढच्या काळात भाजपकडून पुनरावृत्ती होऊ नये. अशी अपेक्षा आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. मागच्या काळात आम्ही मोदीजींचं काम केलं होतं. 1990 सालापासून आम्ही भाजपचा खासदार आम्ही निवडून दिला आहे. यावेळी सुद्धा आम्ही कुठल्या गोष्टीची कमतरता करणार नाही. आम्ही नवरदेव वाले आहोत ते नवरीवाले आहे. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हाला नवरदेव वाला समजून मदत करावी हीच अपेक्षा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. तर मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या पुढच्या काळात घडणार नाही. असं आश्वासन राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत वरिष्ठांनी दिलं आहे, असेगी गुलाबराव पाटील म्हणाले.