अररर बाबा…हे काय! परिक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट, विद्यार्थी पास तर प्रशासन सपशेल नापास
गोंदिया जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाला तडा गेल्याचे समोर आले असून अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. कॉपीमुक्त अभियान सफल करण्यास महसूल आणि पोलीस शिक्षण विभाग अपयशी ठरले आहेत.
गोंदिया, ३ मार्च २०२४ : राज्यभरात सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. अशातच काही राज्यात परीक्षेसंदर्भात गैरप्रकार समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेण्यात येत आहेत. या परीक्षेमध्ये गैर मार्गाचा वापर टाळण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग या तिघांनी मिळून एकत्रित बैठक घेऊन गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणताही कॉपी सारखा गैरव्यवहार होणार नाही याकरिता समितीकडे करून मोठा गाजावाजा केला होता, परंतु त्यांच्या या कॉपीमुक्त अभियानाला कुठेतरी गोंदिया जिल्ह्यात या अभियानाला बगल देत गोंदिया जिल्ह्यातील अनेक दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर अनेक जण शाळेच्या भिंतींवर चढून कॉपी पुरवत असल्याचे व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे कुठेतरी कपिमुक्त अभियानाला तडा जाऊन या अभियानाला पोलीस विभाग कमी पडत असल्याचे चिन्ह गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या दिसून येत आहे.