लोकसभा निवडणुकीपूर्वीत कोकणात तुफान राडा, राणे विरूद्ध भास्कर जाधव समर्थक भिडले
मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला. नुसताच राडा नाहीतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकणात राडा झाला. मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला. नुसताच राडा नाहीतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. गुहागरमध्ये निलेश राणे यांची सभा होती. त्यापूर्वी निलेश राणे चिपळूणमधून गुहागरमध्ये जात असताना भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. ज्यात काही कार्यकर्ते जखमी झाले तर निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाडी फुटली. विशेष म्हणजे हा राडा चिपळुणमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर झाला. अखेर पोलिसांनी ही दगडफेक रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. बघा नेमकं काय झालं?
Published on: Feb 17, 2024 11:23 AM
Latest Videos