Disha Salian हिच्या वडिलांनीही हात जोडले, विषय थांबवा | Kishori Pednekar

Disha Salian हिच्या वडिलांनीही हात जोडले, विषय थांबवा | Kishori Pednekar

| Updated on: Feb 19, 2022 | 4:42 PM

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात चाललेल्या पॉलिटीकल वॉरमुळे राजकारणातली धग सध्या वाढलीय. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही बाजुने वार सुरू आहेत.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात चाललेल्या पॉलिटीकल वॉरमुळे राजकारणातली धग सध्या वाढलीय. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही बाजुने वार सुरू आहेत. त्यातच काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा बॉम्ब फोडला. दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्याबद्दल ट्विट करत राणेंनी मातोश्रीतील काही जणांसाठी ईडीच्या नोटीसा तयार असल्याचे ट्विट केले. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. भाजपची आघाडी बदनामी कडे वळतेय, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. तीन पैशांचा तमाशा किरीट सोमेयांच्या माध्यमातून मुंबईत होतोय. त्यांनी दिशा सलीयन बद्दल काढलेले उदगार व्यथित करणारे आहेत. तिच्या रिपोर्टला खोटं ठरवण्याचं काम ते करत आहेत, असाआरोप महापौरांनी केला आहे.

Published on: Feb 19, 2022 04:01 PM