मुसळधार पावसासह वादळी वारा, हवामान खात्याचा इशारा!
समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलेला आहे. 15 तारखेपर्यंत राज्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट दिलेला आहे.
मुंबई: मुंबईत मुसळधार (Mumbai Heavy Rain) पावसासह 40 ते 50 किलोमीटर प्रति वेगानं वारे वाहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. समुद्रात 4.47 मीटर उंचीच्या लाटा उसळतायत.समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलेला आहे. 15 तारखेपर्यंत राज्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट दिलेला आहे. कोकण गोवा,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 15 तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांनी (Citizens) घरबाहेर पडताना काळजी घ्या हवामान विभागाचं आवाहन आहे. मुंबईत सकाळपासून पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबईला 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मुंबईत पावसामुळे (Mumbai Monsoon) सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. माटुंगा सायन गांधी मार्केट रस्त्यावर पाणी साचून रस्त्यांना तलावाचा स्वरूप आलंय.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?

ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा

पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?

'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
