Prabhani News | जालना लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाकडून बंदची हाक
VIDEO | जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभरात उमटले, परभणी शहरासह पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, मानवत आदी ठिकाणी कडकडीत बंद आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त जिल्हाभरात तैनात
परभणी, २ सप्टेंबर २०२३ | जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना आपल्याला दिसून येत आहेत. परभणीत मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे रस्ता रोको करण्यात आला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, शहरात रात्री उशिरा एका एसटीवर अज्ञातांनी दगडफेक करण्यात आली. विविध संघटनांकडून आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्हाभरात आज कडकडीत बंद पाळला जात आहे. परभणी शहरासह पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, मानवत आदी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जिल्हाभरात तैनात करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार जिल्ह्यात घडलेला नाही. मराठा समाज बांधवांकडून आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
