शहादा शहरात अवाच्या सव्वा घरपट्टी, पालिकेची आडमुठी भूमिका अन् नागरिकांचा संताप
VIDEO | नवीन वसाहतीतील घरांची मोजणी न करता अंदाजे घरपट्टी आकारल्याचा नागरिकांचा आरोप
जितेंद्र बैसाणे ,टीव्ही 9 मराठी, नंदुरबार : शहादा नगरपालिकेच्या वतीने मार्च महिन्यात घरपट्टी वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता कर वसुली संदर्भात नोटीस पाठवण्यात येत आहेत, मात्र कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता अंदाजे घरपट्टी पाठविण्यात आल्याचा आरोप शहादा शहरातील नागरिकांनी केला आहे. एकीकडे पालिकेकडून घरपट्टी वसुली संदर्भात कडक भूमिका अवलंबली जात असली तरी दुसरीकडे नवीन वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याचा अभाव असल्याचा आरोप शहादा शहरातील महिलांनी केला आहे, आम्ही कर भरत असू तर आम्हाला सुविधा दिल्या गेल्या पाहिजे मात्र आमच्या भागात मूलभूत सुविधा नसल्या तरी पालिका आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
Published on: Mar 17, 2023 11:41 AM
Latest Videos