धनगर समाजाचं 21 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे, मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका काय?
VIDEO | गेल्या 21 दिवसांपासून सुरू असेललं ओबीसी धनगर समाजाचं उपोषण आज अखेर मागे घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रकरणात दुसऱ्यांदा चौंडीत दाखल होत याप्रकरणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला अन् त्यांच्या शिष्टाईला यश
अमरावती, २६ सप्टेंबर २०२३ | गेल्या २१ दिवसांपासून अहमदनगरच्या चौंडी या गावात धनगर समाजाचं आंदोलन सुरू होतं. गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आज अहमदनगर येथे दाखल होत उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि उपोषणकर्ते आणि मुख्यमंत्री यांच्यात संवाद घडवून आणला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, अशी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांची मागणी आहे. मात्र सरकारकडून कित्येकदा चर्चेचे प्रयत्न करण्यात आले मात्र कोणताही तोडगा निघाल्याचे दिसत नव्हतं. मात्र दिवसेंदिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे माध्यमातून पाहायला मिळत होते. त्यांनी उपचारासही नकार दिला होता. मात्र आज गिरीश महाजन यांनी याप्रकरणात दुसऱ्यांदा चौंडीत दाखल होत याप्रकरणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला अन् त्यांच्या शिष्टाईला यश आल्याचे पाहायला मिळालेय.