Varsha Gaikwad यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन, अनेक गाड्यांची तोडफोड

| Updated on: Jan 31, 2022 | 7:45 PM

हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक (vikas pathak) यांच्या आवाहनानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहता आणि हजारो संख्येने जमलेले विद्यार्थी पाहता विद्यार्थी खरोखरच हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर रस्त्यावर उतरले की विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मुंबई: धारावीत आज विद्यार्थ्यांचा (student) आक्रोश पाहायला मिळाला. ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांच्या धारावीतील निवासस्थानाबाहेर गर्दी करत जोरदार आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांचेही धाबे दणादणले. हजारोच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला. त्यामुळे धारावीत एकच अफरातफर माजली. या आंदोलनामुळे राज्य सरकारही खडबडून जागे झाले आहे. हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक (vikas pathak) यांच्या आवाहनानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहता आणि हजारो संख्येने जमलेले विद्यार्थी पाहता विद्यार्थी खरोखरच हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर रस्त्यावर उतरले की विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय असा प्रश्न निर्माण झाला आहे.