Sonu Sood Fan | अभिनेता सोनू सूदला भेटण्यासाठी तेलंगणाहून विद्यार्थी पायी चालत मुंबईत

Sonu Sood Fan | अभिनेता सोनू सूदला भेटण्यासाठी तेलंगणाहून विद्यार्थी पायी चालत मुंबईत

| Updated on: Jun 11, 2021 | 7:51 PM

अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) भेटण्यासाठी तेलंगणाच्या विद्यार्थ्याने 700 किमी पायी चालत हैदराबादहून मुंबई गाठली (Student from Telangana walk to Mumbai to meet actor Sonu Sood)

मुंबई : अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) भेटण्यासाठी तेलंगणाच्या विद्यार्थ्याने 700 किमी पायी चालत हैदराबादहून मुंबई गाठली. तेलंगणाच्या विकाराबाद येथे राहणारा व्यंकटेश हा इंटरमीडिएटसाठी अभ्यास करतो. सोनू सूदचा तो मोठा चाहता आहे. व्यंकटेश हैदराबादहून 700 किमी चालत मुंबईत आला. आपल्या आवडता स्टार सोनू सूदला भेटण्यासाठी तो मुंबईला पोहोचला आणि गुरुवारी संध्याकाळी सोनू सूदच्या घरी पोहोचला. आपल्या फॅनची माहिती मिळाल्यावर सोनू सूद व्यंकटेशच्या स्वागतासाठी गेटवर गेला. सोनू सूद आपल्या इतक्या मोठ्या फॅनला पाहून खूप आनंदित झाला. त्याने व्यंकटेशचे आभार मानले. शेवटी व्यंकटेशची वेदनाही सूदने ऐकली. त्यानंतर सोनू सूदने सर्वांना हा संदेश दिला की जीव धोक्यात घालून कोणीही असे पाऊल उचलू नये. नंतर सोनू सूद यांनी व्यंकटेशला परत गाडीने हैदराबादला पाठवले (Student from Telangana walk to Mumbai to meet actor Sonu Sood).