Aurangabad Kabra College : विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, दोषींवर कारवाई केली जाईल, उदय सामंत यांची माहिती
विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
औरंगाबाद: औरंगाबादच्या (Aurangabad) काबरा कॉलेजमध्ये (College) परीक्षेत गोंधळ उडाल्याचं समोर आलंय. या कॉलेजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्यानं गोधळ उडाल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. परीक्षेच्या वेळी एकाच बाकावर चक्क तीन तीन विद्यार्थी (Students) बसवल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. पण, क्षमता नसताना परीक्षा घेतली कशी, विद्यार्थ्यांना एकाच बाकावर बसवलं कसं, असे अनेक प्रश्न निर्माण होतायेत. यामुळे यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत मंत्री महोद्यांनी दिले आहेत. बीएस्सी, बायोटेक, बीएसी आयटी या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याचं दिसून आलंय. आता येत्या काळात यावर काय कारवाई होते, ते पहावं लागेल.