Central Railway BIG update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता, कारण मोटरमन...

Central Railway BIG update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता, कारण मोटरमन…

| Updated on: Aug 28, 2024 | 12:25 PM

मोटरमनचा प्रशानसनाच्या काराभाराबाबत असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाच्या नवीन धोरणाला विरोध करण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटारमन हे जादा काम करणं बंद करणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या १ हजार ८१० लोकल फेऱ्यांवर मर्यादा येणार आहेत. याचाच फटका मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे.

मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा आज विस्कळीत होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण आज मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे मजदूर संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत असून मध्य रेल्वेचे मोटारमन अतिरिक्त काम करणार नसल्याची माहिती मिळत असून मोटरमन आज जादा काम बंद आंदोलन करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होऊन मध्य रेल्वे आज बुधवारी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेचे मोटारमन जादा काम करणं टाळणार आहेत. तर मोटारमन नियोजित असणारं कामच करणार आहेत, असे रेल्वे मजदूर संघाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बुधवार किंवा गुरूवारपासून मध्य रेल्वेचे मोटारमन जादा काम करणं बंद करणार असून मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जर मध्य रेल्वेच्या मोटारमन यांनी जादा काम बंद आंदोलन केलं तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 28, 2024 12:25 PM