Santosh Deshmukh : ‘त्या’ डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपी सापडले, पुण्यात आरोपी कसे लपले?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य फरार आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पोलिसांच्या हाती लागला. विशेष म्हणजे पुण्यातच हे दोन्ही आरोपी लपून बसले होते. मात्र वायभसेच्या चौकशीतूनच जी पुढे माहिती आली त्यातूनच हे फरार आरोपी पोलिसांच्या हाती...
अखेर पुण्यातून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली. मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. पण आणखी एक आरोपी सिद्धार्थ सोनवणे याला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्यात. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य फरार आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पोलिसांच्या हाती लागला. विशेष म्हणजे पुण्यातच हे दोन्ही आरोपी लपून बसले होते. मात्र वायभसेच्या चौकशीतूनच जी पुढे माहिती आली त्यातूनच हे फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागले. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला रात्री पुण्यातून बीड पोलिसांनी उचललं. तर घुले आणि सांगळे तसंच अजूनही फरार असलेला कृष्णा आंधळे हे भिवंडीत दोन दिवस होते. डॉक्टर संभाजी वायभसेला सुद्धा अटक करण्यात आली आहे. तर त्याच्याच चौकशीतून घुले आणि सांगळे यांचा अड्डा समजला आणि पोलिसांनी अटकेची कारवाई केली. सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून अटक झाली आहे. तर सिद्धार्थ मुळचा मसाजोगचाच असून त्याने आरोपींना अपहरणासाठी सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगितलं होतं. केस कोर्टान सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.