संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार अन् मोस्ट वाँटेड घोषित
संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या आरोपात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत. यापैकी कृष्णा आंधळे हा हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात पोलीस डायरीत 2023 पासूनच फरार म्हणून घोषित आहे. पण तरीही तो उघड माथ्याने फिरत होता. सुदर्शन घुलेवरही 2023 मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या 28 दिवसानंतर फरार तिन्ही आरोपींना मोस्ट वॉन्टेड घोषित केलं गेलं. सीआयडीकडे तपास आल्यानंतर बीड पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न उभे राहत आहेतय. पोलिसांकडून सीआयडीने तपास हाती घेतल्यानंतर फरार आरोपीविषयी खळबळजनक माहिती समोर आली. संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या आरोपात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत. यापैकी कृष्णा आंधळे हा हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात पोलीस डायरीत 2023 पासूनच फरार म्हणून घोषित आहे. पण तरीही तो उघड माथ्याने फिरत होता. सुदर्शन घुलेवरही 2023 मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्या खटल्यात तो जामिनावर बाहेर होता. 28 ते 30 दिवस होऊनही अपहरण आणि हत्येचे तीनही मुख्य आरोपी पोलिसांना सापडलेले नाही. त्यामुळे हत्येच्या जवळपास महिन्याभरानंतर पोलिसांनी तिघांना मोस्ट वॉन्टेड घोषित केले आहे. सुदर्शन घुले याच्यावर 10 गुन्हे, सुधीर सांगळेवर 05 गुन्हे तर कृष्णा आंधळे याच्यावर 07 गुन्हे दाखल आहेत. यापैकी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे दोन्ही आरोपी ऊसतोड मुकादम आहेत. दादागिरी, भाईगिरी करत दहशत निर्माण करणं, रील व्हिडीओ करून हवा करणं हा सुदर्शन घुलेचा छंद राहिला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात उपलब्ध आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येत सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत. तर खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि प्रतिक घुले आरोपी आहेत. सीबीआयने कोर्टात केलेल्या दाव्यानुसार अव्हाडा पवन चक्की कंपनीत झालेले मारहाण आणि हत्येच खंडणी प्रकरणाशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे.