Sudhir Mungantiwar | जाहीरमाना शुद्धीवर असताना केलाय का? मुनगंटीवारांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून घेतलं आहे. राजकाणात शिमगा का करतायत तुम्ही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासने दिली. पण या जाहीरनाम्यात शपथनामा हा शब्द उपयोगात आणला. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी शपथ घेतली. हा शपथनामा मांडताना शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, असे या जाहीनाम्यात सांगण्यात आले, असे मुनगंटीवार म्हणाले.
मुंबई : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून घेतलं आहे. राजकाणात शिमगा का करतायत तुम्ही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासने दिली. पण या जाहीरनाम्यात शपथनामा हा शब्द उपयोगात आणला. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी शपथ घेतली. हा शपथनामा मांडताना शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, असे या जाहीनाम्यात सांगण्यात आले. अर्धवट व्हिडीओ दाखवून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद व्हावा यासाठी काम करताय का ? एसटी महामंडळाची प्रचंड अशी संपत्ती आहे. कर्मचाऱ्यांनी लाल रक्त आटवून लाल रंगाची बस लोकांच्या सेवेत सुरु ठेवली. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. तर हे सरकार लोकशाहीच्या माध्यमातून भस्मसात होईल. आमचे सरकार येईल तेव्हा ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल, ज्यांना सेवामुक्त करण्याचा डाव रचला जात आहे त्यांना आंदोलन संग्राम सैनिक म्हणून दर्जा दिला जाईल. तसेच कर्मचाऱ्यांचे जेवढे नुकसान झाली आहे, त्याच्या दुप्पट नुकसान भरपाई दिली जाईल, असे मुनगंटीवार म्हणाले.