“लोकसभेच्या 22 जागा आमच्याच”, गजानन किर्तीकर यांच्या दाव्यावर भाजप नेता म्हणाला…
शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केलेल्या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात सारं काही अलबेल नसल्याचं चित्र समोर आले आहे. भाजप आम्हाला सापत्न वागणूक मिळते असा आरोप गजानन किर्तीकर यांनी केला होता. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केलेल्या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात सारं काही अलबेल नसल्याचं चित्र समोर आले आहे. भाजप आम्हाला सापत्न वागणूक मिळते असा आरोप गजानन किर्तीकर यांनी केला होता. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला याबाबत माहिती नाही, पण असा त्यांनी काय प्रश्न केला असेल तर त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचार करतील”, असं मुनगंटीवार म्हणाले.”एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला त्यामुळे भाजप त्यांचा नेहमी सन्मान करेल. शिवसेनेबाबत आम्हाला आधीही सन्मान होता आणि आताही एकनाथ शिंदे बाबत आम्हाला आहे. 22 जागांचा दावा मान्य नाही असं वक्तव्य भाजपाच्या कुठल्याही नेत्याने केलं नाही. जागावाटपासारखे महत्त्वाचे प्रश्न असे टीव्हीवरच्या चर्चेने सुटत नाहीत. हा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेतून सुटेल.आमचा उद्देश खुर्चीसाठी नाही तर आमच्यासाठी जनतेचे हित महत्वाचे आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.