Fast News | फास्ट न्यूज | 6 PM | 1 November 2021
भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी समोर हजर होण्याच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी समोर हजर होण्याच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनिल देशमुख ईडीसमोर हजर होण्यासाठी दोन ते तीन बाबी कारणीभूत असल्याचं मुनंगटीवार म्हणाले. संपत्तीवर टाच येणं, अटकपूर्व जामिनाच्या शक्यता संपल्या आणि सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात येणं ही कारणं लक्षात आल्यानं अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले, असावेत अशी शक्यता सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीच्या ताब्यात आल्यावरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर येण्याचा मुहूर्त का साधला , असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. आपण सांगू ते एसआयटी सचिन वाझे कडून वदवून घेतील आणि त्यामुळे मी आता ईडी समोर गेलो तर धोका नाही असं देशमुख यांना वाटलं असावं, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.