थकीत एफआरपीप्रश्नी 86 कारखान्यांना नोटीस, रक्कम न दिल्यास साखर कारखान्यांवर काय कारवाई?
VIDEO | शेतकऱ्यांचा सुमारे 817 कोटी रूपयांचा एफआरपी थकीत, 86 साखर कारखान्यांना बजावली नोटीस
मुंबई , 28 जुलै 2023 | थकीत एफआरपीप्रश्नी राज्यातील 86 कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा सुमारे 817 कोटी रुपयांचा एफआरपी थकीत आहे. यासंदर्भातील सुनावणी तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. होणाऱ्या सुनावणीमध्ये या 86 साखर कारखान्यांच्या अध्यक्ष आणि संचालकांचं म्हणणं ऐकून घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान थकीत एफआरपी रक्कम तात्काळ दिली नाही तर संबंधित साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
Published on: Jul 28, 2023 12:23 PM
Latest Videos