संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध सुजय विखेंमध्ये रंगणार महामुकाबला? विधानसभेबाबत काय दिले संकेत?
संगमनेरमध्ये झालेल्या मेळाव्यातून सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीकरता आपल्या उमेदवारीचे संकेत देखील दिल्याचे पाहायला मिळत आहे. या मेळाव्यात सुजय विखे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे असे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये आता थोरात विरुद्ध सुजय विखे?
सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, संगमनेरमध्ये झालेल्या मेळाव्यातून सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीकरता आपल्या उमेदवारीचे संकेत देखील दिल्याचे पाहायला मिळत आहे. या मेळाव्यात सुजय विखे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे असे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये आता थोरात विरुद्ध सुजय विखेंमध्ये महामुकाबला होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. जर समजा संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील विधानसभा निवडणुकीकरता मैदानात उतरले तर त्यांच्यासमोर बाळासाहेब थोरांतांचे तगडे आव्हान असणार आहे. दोन दिवसांपूर्वी राहुरी आणि संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र संगमनेरमधूनच सुजय विखे पाटील यांची निवडणूक लढवण्याची इच्छा दिसतेय. बघा नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील?