'ज्या दुकानात वाईन विक्री होईल ते दुकान बंद करणार', सुजय विखे पाटलांचा इशारा

‘ज्या दुकानात वाईन विक्री होईल ते दुकान बंद करणार’, सुजय विखे पाटलांचा इशारा

| Updated on: Feb 08, 2022 | 12:00 AM

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ज्या किराणा दुकानात वाईन विक्रीसाठी ठेवली जाईल ते दुकान फोडण्याचा इशारा दिलाय. जलील यांच्या पाठोपाठ आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल ते दुकान मी स्वत: बंद करणार, असा इशारा दिला आहे. ते राहता येथे लायन्स क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते.

ठाकरे सरकारच्या एका निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. किराणा दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये दारु विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपसह अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी तीव्र शब्दात विरोध केलाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तर ठाकरे सरकारला बेमुदत संपाचा इशाराच दिला आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ज्या किराणा दुकानात वाईन विक्रीसाठी ठेवली जाईल ते दुकान फोडण्याचा इशारा दिलाय. जलील यांच्या पाठोपाठ आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल ते दुकान मी स्वत: बंद करणार, असा इशारा दिला आहे. ते राहता येथे लायन्स क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते.

खासदार सुजय विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री सांगोत किंवा राज्य सरकार शिर्डी मतदारसंघात किराणा दुकानात वाईन विक्री होऊ देणार नाही. जे किराणा दुकानदार वाईन विक्री करतील ती दुकाने मी स्वत: बंद करणार, असा इशाराच सुजय विखे यांनी दिलाय. ज्या विषयात समाजहित नाही त्याला मी विरोध करत राहणार. अनेक शाळा आणि महाविद्यालयातील तरुण-तरुणींचे प्रश्न मी सोडवले आहेत. जे मंत्री आहेत, सत्ताधारी आहेत त्यांच्या घरातील महिलांसोबत वाईट वेळ येऊ देणार नाही. परमेश्वर करतो तशी वाईट वेळ येऊ नये. मात्र, ती वेळ शिर्डी मतदारसंघात येण्याची वाट आपण पाहणार नाही, असंही सुजय विखे म्हणाले.