भर सोहळ्यात भाषण करतांना सुजय विखे पाटील हे भावूक, काय कारण?

भर सोहळ्यात भाषण करतांना सुजय विखे पाटील हे भावूक, काय कारण?

| Updated on: Jun 17, 2023 | 6:33 AM

VIDEO | गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार सांगता सभेत खासदार सुजय विखे पाटील यांना अश्रू अनावर

अहमदनगर – राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार सांगता सभा तसेच महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे भावुक झाल्याचं बघायला मिळालं. कारखाना चालवताना कुटुंबाची होणारी ओढाताण आणि मुलगी विचारात असलेल्या प्रश्नाबाबत बोलताना खासदार सुजय विखे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक निकालानंतर विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतील कारण विखे पाटील कुणाची उधारी ठेवत नाहीत आम्ही व्याजासह परत करतो असा सज्जड दम सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाचा पॅनल रिंगणात आहे. १७ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून १९ तारखेला निकाल जाहीर होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jun 17, 2023 06:33 AM