‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, हे पूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे, सुजय विखेंकडून भरसभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’
'पूर्ण महाराष्ट्राला पाहुद्या, जो सुस्ंकृत चेहरा महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतात. या सुस्ंकृत चेहऱ्यामागील दहशत काय असतं? आणि त्या रात्री नेमकं काय घडलं हे सगळ्या महाराष्ट्रात गेलं पाहिजे...', असं म्हणत सुजय विखेंचा भर भाषणात लाव रे तो व्हिडीओ...
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या मतदारसंघात विखे पाटील विरुद्ध थोरात कुटुबीयांचा संघर्ष चांगलाच टोकाला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमधील एका सभेत माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे तेथील मतदारसंघात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अहमदनगरमधील धांदरफळ बुद्रूक येथे सुजय विखे-पाटील यांची सभा पार पडली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल सभेत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. अशातच सुजय विखे पाटील यांनी आपल्या संगमनेरच्या एका भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारखं लाव रे तो व्हिडीओ स्टाईल भाषण केल्याचे पाहायला मिळाले. तोडफोड करणाऱ्यांचे थेट फोटो आणि व्हिडीओच सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान दाखवलेत. बघा काय म्हणाले सुजय विखे पाटील आणि कोणते दाखवले व्हिडीओ?