Maratha Reservation : मराठवाड्यातील पहिलं कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळालं? धाराशिवमध्ये दाखले वाटण्यास सुरूवात
धाराशिव येथे धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्याकडून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरूवात. शिंदे समितीच्या अहवालनंतरचे धाराशिव, मराठवाड्यातील पहिले प्रमाणपत्र देण्यात आले. कारी या गावातील सुमित भारत माने याला जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासेंकडून मिळाले प्रमाणपत्र
धाराशिव, १ नोव्हेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार ज्यांच्याकडे कुणबी जातीच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. या निर्णयावर जरांगे पाटील यांनी विरोध दर्शविला आहे. मात्र आता धाराशिव येथे धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्याकडून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरूवात झाली आहे. शिंदे समितीच्या अहवालनंतरचे धाराशिव जिल्ह्यातील किंबहुना मराठवाड्यातील पहिले प्रमाणपत्र देण्यात आले आहे. धाराशिव तालुक्यातील कारी या गावातील सुमित भारत माने या पात्र लाभार्थीला जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सुमित माने या लाभार्थीचे पंजोबा कृष्णा दादा माने यांचे गाव नमुना 14 वरील 1917 चा कुणबी असल्याचा पुरावा सापडल्यानंतर या मराठा असणाऱ्या सुमित मानेला कुणबी दाखला मिळाला आहे.