यंदा भाकरी फिरणार... सुनेत्रा वहिनीच..., अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार

यंदा भाकरी फिरणार… सुनेत्रा वहिनीच…, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार

| Updated on: Mar 03, 2024 | 2:28 PM

राष्ट्रवादीत फूट पडलेली असताना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येच पवार कुटुंबात थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचेही म्हटले जात आहे.

मुंबई, ३ मार्च २०२४ : यंदा पहिल्यांदाच बारामतीतील लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पवार विरूद्ध पवार असा सामना रंगताना दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीत फूट पडलेली असताना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येच पवार कुटुंबात थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचेही म्हटले जात आहे. अशातच आता बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांचे स्टेटस ठेवण्यात आले आहे. तर यंदा भाकरी फिरणार, यंदा विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार खासदार होणार…बारामतीच्या अजित पवार गटातील कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर स्टेटस टाकून सुनेत्रा पवार यंदा खासदार होणार असल्याची घोषणाबाजी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही तासांपूर्वी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुतारीचं स्टेटस ठेवत प्रचार सुरू केला होता. त्यानंतर अजित पवार गटाकडून असा प्रचार करण्यात येत आहे.

Published on: Mar 03, 2024 02:28 PM