सुनील केदार यांची जेलमधून सुटका अन् कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष, काय आहे प्रकरण?
एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सुनील केदार यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तर काहींनी मोठा जल्लोष करत मोठी रॅली देखील काढली.
नागपूर, १० जानेवारी २०२४ : माजी मंत्री सुनील केदार यांना काल उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली आहे. एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सुनील केदार यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तर काहींनी मोठा जल्लोष करत मोठी रॅली देखील काढली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याच घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. तर प्रत्येक एकूण १२ लाख ५० हजार रूपये दंड ठोठावण्यात आला होता. याच प्रकारणात आता केदार यांची सुटका झाली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी जेलच्या समोर मोठी गर्दी केली … टायगर इज बॅक अशा प्रकारे हातात होर्डिंग घेऊन कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहे तर दुसरीकडे जेल चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र असल्याने काही समर्थकांना पोलिसांनी नोटीसही बजावल्या आणि पोलिसांनी जेल परिसरात कडेकोट असा बंदोबस्त तैनात केला आहे.