सुनील पाटील यांचं बदल्यांचं रॅकेट, गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे?, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा: मोहित कंबोज
आर्यन खानसह क्रुझवरील अन्य लोकांना एनसीबीच्या जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे.
मुंबई : आर्यन खानसह क्रुझवरील अन्य लोकांना एनसीबीच्या जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे. त्याचं खूप मोठं रॅकेट आहे. सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होता. तोच पैसा घ्यायचा आणि संबंधित मंत्र्यांना द्यायचा. त्याचं आणि गृहमंत्र्यांचं कनेक्शन काय आहे, याची संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी मोहित कंभोज यांनी केला आहे.
Published on: Nov 06, 2021 12:24 PM
Latest Videos