Sunil Shukla : काही वर्षांपूर्वी मनसेच्या रॅलीमध्ये दिसायचे; आता तेच सुनील शुक्ला मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात, फोटो व्हायरल
Manish Dhuri Shared Sunil Shukla Photo : मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणाऱ्या सुनील शुक्ला यांचे मनसेच्या प्रचार रॅलीमधले फोटो मनीष धुरी यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारे सुनील शुक्ला हे काही वर्षांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले होते. या रॅलीचे फोटो मनीष धुरी यांच्याकडून सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेले आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मनसे आणि मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी या याचिकेत आहे. तसंच राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणामुळे हिन्दी भाषिकांना मारहाण होत असल्याचाही उल्लेख या याचिकेत आहे. त्यानंतर आता मनीष धुरी यांनी सुनील शुक्ला यांचे काही जुने फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. राज ठाकरे यांच्या एका प्रचार सभेच्या रॅलीमध्ये काही वर्षापूर्वी सुनील शुक्ला सहभागी झालेले होते. त्याच कार्यक्रमाचे हे फोटो आहेत. “अरेच्या! हाच का तो सुनील शुक्ला?” असं कॅप्शन देत धुरी यांनी हे फोटो पोस्ट केलेले आहेत.

विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट

काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड

पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?

कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
