पहाटेच्या शपथविधीला अजितदादा स्वतः गेले की शरद पवारांनी पाठवलं? सुनील तटकरे म्हणाले...

पहाटेच्या शपथविधीला अजितदादा स्वतः गेले की शरद पवारांनी पाठवलं? सुनील तटकरे म्हणाले…

| Updated on: Mar 01, 2024 | 12:50 PM

पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांना शरद पवार यांनी पाठवले होते की ते स्वत: गेले होते. त्या प्रश्नाचे उत्तर काळाच्या ओघात मिळणार, असे म्हणत सुनील तटकरे यांनी पहटेच्या शपथविधीवर भाष्य केले. पण पहाटेचा शपथविधी नेमका झाला कसा? सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबई, १ मार्च २०२४ :  पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांना शरद पवार यांनी पाठवले होते की ते स्वत: गेले होते. त्या प्रश्नाचे उत्तर काळाच्या ओघात मिळणार, असे म्हणत सुनील तटकरे यांनी पहटेच्या शपथविधीवर भाष्य केले. ते म्हणाले, दादांची कोअर कमिटी नव्हती. पण त्यांचा विश्वासाचा सहकारी म्हणून माझी वाटचाल झाली. ज्या काळात भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा विविध पर्याय निर्माण झाले होते. दोन पर्याय होते. आम्ही दोन्ही पर्याय सुरू ठेवले होते. भाजपसोबत चर्चा सुरू होती आणि काँग्रेस-शिवसेनेसोबतही चर्चा सुरू होती. ही चर्चा पक्षा नेतृत्वाच्या संमतीतूनच होती. दिल्लीत ज्या बैठका झाल्या. १५ ते २० दिवसात चर्चा झाल्या. दिल्लीतून अहमदभाई पटेल, मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात , शरद पवार, सुभाष देसाई उद्धव ठाकरे आणि संजय राऊत होते. त्या बैठकीतील नूर व्यवस्थित नव्हता. त्यानंतर विविध घडामोडी झाल्या आणि त्यातूनच सकाळचा शपथविधी झाला असल्याचा गौप्यस्फोट तटकरे यांनी केला. तर पहाटेची शपथ नव्हीत. ती ८ वाजेची शपथ होती. लख्ख प्रकाशात झाली. काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील. काळ हेच उत्तर आहे. रहस्य तसंच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

Published on: Mar 01, 2024 12:50 PM