Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 04 January 2022
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनचे सावट वेगळेच. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले.
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनचे सावट वेगळेच. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले. शिवाय मुंबईत लॉकडाऊन लावणार का, याबाबत सूचक वक्तव्य केले. काय म्हणाल्या पेडणेकर, जाणून घेऊयात.
महापौर पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईमध्ये कोरोनाचे वाढणारे रुग्ण पाहता शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील. शिवसेनेने स्वतः दोन कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे तुम्हीही मोठी गर्दी आणि कार्यक्रम जरूर टाळा, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
Latest Videos