Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 20 December 2021

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 20 December 2021

| Updated on: Dec 20, 2021 | 3:18 PM

‘पनामा पेपर्स लीक’ (Panama Papers leak case ) प्रकरणात आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) हिला समन्स पाठवले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला हे समन्स बजावले आहे. ज्या अंतर्गत तिला आता दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नावही समोर आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. ज्याच्या मदतीने एजन्सी आता आपले काम करत आहे.