Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 11 November 2021

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 11 November 2021

| Updated on: Nov 11, 2021 | 5:45 PM

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या आंदोलनावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत रात्र काढली. निर्णय होत नाही तोवर मुंबई सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.