Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 17 November 2021

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 17 November 2021

| Updated on: Nov 17, 2021 | 5:36 PM

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यालयावर अखेर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. मालेगावमध्ये रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाने बंद पुकारला.

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यालयावर अखेर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. मालेगावमध्ये रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाने बंद पुकारला. रॅली काढली. त्यानंतर हिंसाचार उसळला. त्यात अनेक दुकानांची राखरांगोळी करण्यात आली. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी आयोजकांवर फक्त गुन्हा दाखल झाला होता. पुढची कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नव्हती. पोलिसांच्या या भूमिकेवर स्वतः आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे उशिरा का होईना रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे टाकून कारवाई करण्यात आली.